ताल

अभिजात संगीतात तालाचे प्रयोजन

ताल काय आहे

पंडित शारंगदेव यांनी संगीत रत्नाकर या ग्रंथांमध्ये ताल संकल्पना मांडली आहे.  ताल म्हणजे काल क्रियामाणम्, म्हणजे हस्त क्रियेने मोजला जाणारा काळ म्हणजे ताल।

लयीच्या या अथांग प्रवाहात तालाची निर्मिती झाली।

सगळी वाद्य निर्माण होण्याआधी ताल ही संकल्पना अस्तित्वात आली ।

ज्या काळामध्ये वाद्य नव्हती तेव्हा हस्त क्रियेने म्हणजेच हाताने ताल दर्शविला जात असे।

ताल

ताल हे संगीतातील कालमापनाचे एक महान मूलतत्त्व आहे।

लय ही गतिमान आहे चलत आहे एकरेशिय आहे जी कधीही थांबणार नाही। अशा एकरेषीय लयीला संगीत उपयोगी करण्यासाठी लयी मध्ये ताल कल्पना रूढ होणं हे गरजेचं झालं।

ही गतिमान लय बुद्धीच्या आणि कलेच्या कक्षात आली। एक रेषीय लय आता गोलाकार ताला वर्तनात फिरू लागली ,जसे निर्गुण-निराकार लयीला ताला मुळे त्याला सगुण साकार रूप मिळाले।

अशा या मूर्त तालावर्तनात सांगीतिक असे पूर्णत्व यांचा सर्व कलाकार आपापल्या परीने शोध घेऊ लागले।

 ताला मुळे सर्व सांगीतिक व्यवहाराला  एक सुस्पष्ट आकृतीबंध प्राप्त होऊ लागला आणि तालाच्या मर्यादे मुळे कला विधान स्वैर आणि विस्कळीत होण्याचा धोका ठरू लागला।

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या मते ताला मुळे भारतीय संगीताला नेमकं काय मिळालं, तर सीमारेषा दुसरे अनुशासन आणि तिसरे आवर्तन क्रिया आणि दुसरे म्हणजे मुखडा आणि सम।

या तिन्ही वरदानच आपण जरा अधिक तपशिलात जाऊन तपासून पाहूया।

ताल

कुंपण

म्हणजे सीमारेषा मात्राकलांचे बंधन।

जसे चित्र रेखाटण्यासाठी कागदावर प्रथम चौकट आखली जाते ,विविध खेळांमध्ये लांबी व रुंदी आखली जाते , तसं संगीत कलेला तालाचा बंधन असते ते बंधन आल्यामुळे एक शिस्त निर्माण होते।

गायन वादन नृत्य कलांचा जो आपण आस्वाद घेतो तो तालाच्या या भरभक्कम चौकटीच्या आधारेच फुलतो।

भारतीय संगीतात तीन मात्रा पासून ते 108 मात्रा पर्यंत विविध तालआहेत ,ज्यामुळे प्रस्तुतीकरणा मध्ये एक वैविध्य व नवनिर्मितीची शक्यता वाढते।

अनुशासन

म्हणजे शिस्त, आता कुंपण दिलं आणि कुंपणातच फिरायचं म्हटलं की फिरणाऱ्याला कळत-नकळत एक शिस्त लागली जाते, म्हणजे तालाचे जे खंड किंवा टाळ्या याच्यामुळे गायक किंवा वादक यांना त्याच्यानुसार आपली कला ही सादर करावी लागते।

जे तालाचे नियम आहेत त्या चौकटीत राहून त्याला त्याची कला सादर करावे लागते।

उदाहरण द्यायचे म्हणजे आज दीपचंदी आणि आडा चौताल ।

या दोन्ही तालांचे मात्र 14 आहेत पण त्याचे खंड टाळी हे वेग वेगळे आहे ।

दीपचंदी च्या टाळ्या 1,4, 11आहेत, खंड 3,4,3,4 आहेत। पण आडा चौताल याचे उदाहरण द्यायचं तर त्याचे खंड मात्र 2,2,2,2,2, 2असे होतात व टाळ्या पण बदलतात।

हे दोन्ही ताल 14 मात्रांचे असले तरीही त्यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे।

सांगायचा मुद्दा हा की मात्रा काल त्यातील जर्बा व खाली तून निर्माण झालेल्या विभागातून सर्व विस्तार क्रियांना एक शिस्त लागत असते ही शिस्त हे अनुशासन हे ताल व स्वर संगीताला एक दिलेलं मोठं वरदान आहे।

आवर्तन

 म्हणजे पुनरावृत्ती,

भारतीय संस्कृतीत आवर्तन या शब्दाला एक गहन अर्थ आहे ।

आपल्या संस्कृतीत आपण नामस्मरण ,रुद्र, लघुरुद्र याची आवर्तने म्हणतो।

ही आवर्तने केवळ पुनरावृत्ती नसून तिला तपश्चर्येचा दर्जा मिळालेला आहे।

आवर्तनातून एक विलक्षण ऊर्जा आणि त्या ऊर्जेच्या साह्याने एक विशिष्ट भावावस्था गाठणं हे या आवर्तन क्रियेच ध्येय होय।

 या क्रियेतून एक वेगळं मॅग्नेटिक फिल्ड तयार होतं।